मी अहिल्यादेवी यांची जाहीर माफी मागतोय – वा.ना.उत्पात
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी ऐवजी पुण्यश्लोकी अहल्यादेवी असे नाव देणे आवश्यक आहे असे भागवताचार्य वा.ना.उत्पात यांनी मत व्यक्त केले होते. या नंतर एकच खळबळ माजली. धनगर समाजातील काही मंडळी यांनी प्रत्यक्ष श्री.उत्पात यांची भेट घेऊन यावर नाराजी व्यक्त केली.त्यावर श्री उत्पात यांनी व्याकरणाशी निगडीत बाबी समजावून सांगितल्या. तरीही त्यांचे समाधान झाले नाही. तसेच या विषयावर आम्ही श्री.वा.ना.उत्पात यांच्याशी संपर्क साधला असता. ते बोलताना म्हणाले की महाराष्ट्रातील अनेक विचारवंतांनी या विषयावर माघार घ्यावी अशी विनंती केली आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यावर व त्यांच्यावर माझी श्रद्धा आहे. यामूळेच धनगर समाजबांधव व महाराष्ट्रातील सर्व विचारवंतांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या हेतूने मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करत उत्पात म्हणाले. मला अहिल्यादेवी यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे कारण काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आजही त्यांच्या कामाची चर्चा होते. मी त्यांच्यावर पुस्तक लिहून अहिल्यादेवींचे कार्य घराघरात पोहोचविण्याचे काम केले आहे. तसेच त्यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यासाठी मी अनेक वर्षे कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यामुळे मी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची माफी मागतो यानंतर सदर प्रकरणावर पडदा पडावा हीच अपेक्षा