मी फडणवीसांना सुसंस्कृत समजत होतो- पवारांचा टोला

मी देवेंद्र फडणवीस यांना अतिशय सुसंस्कृत समजत होतो. मात्र छगन भुजबळ यांना दिलेल्या धमकीमुळे मुख्यमंत्र्यांची पातळी किती घसरली आहे हे दिसून आले असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. ते अकलूज येथे एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.
धनगर समाजाला आरक्षण देण्यास केंद्रातील मोदी सरकार अनुकूल नसल्याची आपली माहिती असून जर त्यांना आरक्षण द्यायचे असेल तर घटनेत दुरुस्ती करावी लागेल असे पवार यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले . मोदी सरकार धनगर समाजाची फसवणूक करीत असून घटनातज्ज्ञांशी विचारविनिमय करून या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न सोडविता येईल असे ते म्हणाले.
मराठा समाजाला देखील राज्यातील फडणवीस सरकार फसवत आहेत असा आरोप पवार यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी एकाबाजूला निर्णय घेतल्यासारखे करायचे आणि दुसर्‍या बाजूला त्याच निर्णयाला सुरुंग लावायचा असे प्रयत्न सुरु असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी नुकताच पवार यांच्यावर आरोप करत 2009 मध्ये त्यांना माढा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचे म्हंटले होते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, आरोप करणारे मंत्री 10 वर्षे झोपले होते क? त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करायला हवी होती. आरोप करताना थोडे तारतम्य ठेवा असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला. मोहिते पाटील यांना आपल्या राज्यसभेच्या जागेवर घेणार असल्याचे संकेतही पवार यांनी यावेळी दिले . माढ्याची बारामती करू असे आपण कधीच आश्‍वासन दिले नसल्याचेही पवार यांनी सांगितले .
बालाकोट मधील वायूसेनेच्या कारवाईत नेमके किती अतिरेकी ठार झाले आहेत याचा आकडा एकदा सरकारने जाहीर करावा म्हणजे सर्वांच्या मनातील शंका दूर होतील , अशी मागणी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. ते अकलूज येथे पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, सध्या अमेरिका ,इंग्लंडमधील वृत्तपत्रातून हाच प्रश्‍न विचारला जात आहे. काल तिन्ही सेनाप्रमुखांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही हा आकडा काळाला नाही असे ही ते म्हणाले. सैन्यदलाच्या पराक्रमाबाबत आम्हाला शंका नाही मात्र सरकारने नेमके किती आणि कोणते अतिरेकी मारले याची माहिती जाहीर करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सध्या 370 कालमाबाबत मोठी चर्चा सुरु असून काश्मीर भारतात विलीन करताना भारत सरकारने त्यांचे स्वतंत्र अस्तिस्व ठेवण्याचे आश्‍वासन त्यांना दिले होते . आता जर हे कलम रद्द करण्याबाबत हालचाली सुरु असतील तर त्यामुळे फुटीरतावाद वाढीस लागून भारतावरचा काश्मिरी जनतेचा विश्‍वास संपून जाईल असा इशारा शरद पवार यांनी यावेळी दिला .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!