या हंगामात जकराया कारखान्याचे ७ लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट
मोहोळ – तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखान्याने यंदाच्या (सन २०२०-२०२१) गळीत हंगामात कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अॅड. बी बी. जाधव यांच्या नेतृत्वाखाली सात लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी दिली.
जकराया साखर कारखान्यामध्ये गळीत हंगाम 2020-21 साठी मिल रोलरचे पूजन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष बी.बी.जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सचिन जाधव बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, गाळपाच्या उत्कृष्ट नियोजनाची जकराया साखर कारखान्याची उज्वल परंपरा कायम ठेवण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अॅड.बी.बी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कंबर कसली आहे.शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपाला यावा यासाठी सक्षम ऊस तोडणी यंत्रणा उभारण्यास सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून कारखान्याच्या वतीने 200 ट्रॅक्टर, 500 बैलगाडी,200 डम्पिंग तसेच 10 तोडणी मशीन यंत्र यांचे करार करण्यात येत आहे.कारखान्याच्या उपपदार्थ निर्मितीच्या प्रकल्पाचीही इतर कामे प्रगतिपथावर आहेत.
कारखान्याने येत्या गळीत हंगामामध्ये सात लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट ठेवले आहे. यासाठी सर्व ऊस उत्पादक शेतकरी,पंचक्रोषितील बिगर ऊस उत्पादक सभासदानी आपला ऊस कारखान्यास गळीतास देऊन सहकार्य करावे असे आवाहान सचिन जाधव यांनी केले.
यावेळी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष बी.बी.जाधव पूर्णवेळ संचालक राहुल जाधव,मुख्य शेती अधिकारी नानासाहेब बाबर,केन मॅनेजर विजय महाजन, वर्क्स मॅनेजर एस.एस.महामुनी चीफ केमिस्ट डी.एन. आवताडे, डिस्टिलरी मॅनेजर के.सी. कोटकर तसेच कर्मचारी बांधव उपस्थित होते.