रविवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 191 रुग्ण वाढले, पंढरपूर तालुक्यात 62 कोरोनाबाधितांची वाढ
सोलापूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) रविवार 22 नोव्हेंबर रोजी एकूण 191 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात 62 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 112 जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारच्या अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 4 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता दिवाळीनंतर काही तालुक्यात वाढताना दिसत आहे. तर या आजारावऱ मात करून घरी परतणार्यांची संख्या ही मोठी आहे. जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 34223 इतकी झाली असून यापैकी 31753 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 1459 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 112 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 1011 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 4 जण मयत आहेत.
पंढरपूर तालुक्यात 62 रूग्ण वाढले
पंढरपूर– रविवारी 22 नोव्हेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 30 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 32 असे 62 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 921 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 208 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 1 जण मयत आहे. सध्या एकूण 391 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 6322 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .