रविवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 391 कोरोना रुग्ण वाढले , 2 जण मयत
पंढरपूर – रविवारी 28 मार्च रोजी आलेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) 391 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर दोन जण मयत असून यात 39 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय स्त्रीचा समावेश आहे ,ही चिंताजनक बाब असून नागरिकांनी आता आणखी काळजी घेण्याची गरज आहे.
रविवारीच्या अहवालानुसार 5 हजा 178 चाचण्या करण्यात आल्या असून यापैकी 4 हजार 787 चाचण्या निगेटिव्ह तर 391 पॉझिटिव्ह आहेत. आज 144 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये आतापर्यंत एकूण 44 हजार 602 कोरोनाबाधित आढळून आले असून या आजारात 1222 जणांनी प्राण गमावले आहेत तर 40 हजार 749 जणांनी या आजारावर मात केली आहे. सध्या 2693 जणांवर उपचार सुरू आहेत.
रविवारी सर्वाधिक रूग्ण बार्शी तालुक्यात 128 आढळून आले असून यापाठोपाठ माढा तालुक्यात 86 ची नोंद आहे. माळशिरस 53, पंढरपूर 49, करमाळा 37 अशी रुग्णांची नोंद आहे. आजच्या अहवालानुसार मोहोळ व माढा तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्ण कोरोनामुळे दगावला आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 8753 आढळून आले असून यापैकी 247 जणांचा मृत्यू झाला आहे तर 8181 जणांनी कोरोनावर आजवर मात केली आहे. सध्या 325 जणांवर उपचार सुरू आहेत. आज शहरात 26 तर ग्रामीणमध्ये 23 रुग्णांची नोंद आहे.