राज्यात तीन सत्रांमध्ये आतापर्यंत 51 हजार 650 कर्मचाऱ्यांचे लसीकरण

मुंबई, दि. 20 : राज्यात आज 267 केंद्रांवर 18 हजार 166 (68 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून काही ठिकाणी लसीकरणाचे सत्र उशिरापर्यंत सुरु होते त्यामुळे अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो. राज्यात शनिवारी आणि त्यानंतर मंगळवार आणि आज बुधवारी झालेल्या सत्रांमध्ये आतापर्यंत एकूण 51 हजार 660 जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली.
राज्यात आज ३१२ जणांना कोवॅक्सीन लस देण्यात आली असून आतापर्यंत एकूण ८८१ जणांना ही लस देण्यात आली आहे.

*सायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी अशी (कंसात लसीकरण झालेले कर्मचारी आणि टक्के) :

अकोला (224, 75 टक्के), अमरावती (558, 112 टक्के), बुलढाणा (458, 76 टक्के), वाशीम (221, 74 टक्के), यवतमाळ (363, 73 टक्के), औरंगाबाद (310, 31 टक्के), हिंगोली (214, 107 टक्के), जालना (279, 70 टक्के), परभणी (284, 71 टक्के), कोल्हापूर (778, 71 टक्के), रत्नागिरी (290, 58 टक्के), सांगली (435, 48 टक्के), सिंधुदूर्ग (179, 60 टक्के), बीड (358, 72 टक्के), लातूर (473, 79 टक्के), नांदेड (323, 65 टक्के), उस्मानाबाद (240, 80 टक्के), मुंबई (666, 61 टक्के), मुंबई उपनगर (1062, 82 टक्के), भंडारा (241, 80 टक्के), चंद्रपूर (432, 72 टक्के), गडचिरोली (185, 46 टक्के), गोंदिया (223, 74 टक्के), नागपूर (921, 77 टक्के), वर्धा (543, 91 टक्के), अहमदनगर (683, 57 टक्के), धुळे (366, 92 टक्के), जळगाव (523, 75 टक्के), नंदुरबार (313, 78 टक्के), नाशिक (932, 72 टक्के), पुणे (1109, 38 टक्के), सातारा (840, 76 टक्के), सोलापूर (869, 79 टक्के), पालघर (558, 90 टक्के), ठाणे (1774, 77 टक्के), रायगड (139, 35 टक्के)

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!