राज्यात  ३६५ रुग्ण कोरोनामुक्त  होऊन घरी परतले, शनिवारी ३४ जणांना मिळाला डिसचार्ज

*राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३६४८*
*राज्यात ३२८ नवीन रुग्णांचे निदान*
-आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि. १८ : आज राज्यात कोरोनाबाधीत ३२८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३६४८ झाली आहे. आज दिवसभरात ३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३६५ रुग्ण बरे झाले आहेत. तर ३०७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६७ हजार ४६८ नमुन्यांपैकी ६३ हजार ४७६ जणांचे कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३६४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८२ हजार २९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६९९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ११ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २११* झाली आहे. *( * या पूर्वी ११ एप्रिल रोजी कळवलेला एक मृत्यू कोरोना निगेटिव्ह असल्याचे मुंबई मनपाने कळवल्याने सदर मृत्यू एकूण मृत्यूमधून वगळण्यात आला आहे. )* आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई येथील ५ आणि पुणे येथील ४ तर १ मृत्यू औरंगाबाद मनपा आणि १ मृत्यू ठाणे मनपा येथील आहे. त्यात ६ पुरुष तर ५ महिला आहेत. त्यामध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत तर ६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांपैकी ९ रुग्णांमध्ये ( ८२ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

*राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)*
मुंबई महानगरपालिका: २२६८ (१२६)
ठाणे: १८ (२)
ठाणे मनपा: ११६ (२)
नवी मुंबई मनपा: ६५ (३)
कल्याण डोंबवली मनपा: ७३ (२)
उल्हासनगर मनपा: १
भिवंडी निजामपूर मनपा: ४
मीरा भाईंदर मनपा: ६४ (२)
पालघर: २१ (१)
वसई विरार मनपा: ६२ (३)
रायगड: १३
पनवेल मनपा: २९ (१)
*ठाणे मंडळ एकूण: २७३४ (१४२)*
नाशिक: ३
नाशिक मनपा: ५
मालेगाव मनपा: ४५ (२)
अहमदनगर: १९ (१)
अहमदनगर मनपा: ९
धुळे: १ (१)
धुळे मनपा: ०
जळगाव: ०
जळगाव मनपा: २ (१)
नंदूरबार: ०
*नाशिक मंडळ एकूण: ८५ (५)*
पुणे: ११ (१)
पुणे मनपा: ५२८ (४९)
पिंपरी चिंचवड मनपा: ४५ (१)
सोलापूर: ०
सोलापूर मनपा: १४ (१)
सातारा: ११ (२)
*पुणे मंडळ एकूण: ६१६ (५४)*
कोल्हापूर: २
कोल्हापूर मनपा: ३
सांगली: २६
सांगली मिरज कुपवाड मनपा:०
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ६ (१)
*कोल्हापूर मंडळ एकूण: ३८ (१)*
औरंगाबाद:०
औरंगाबाद मनपा: २९ (३)
जालना: २
हिंगोली: १
परभणी: ०
परभणी मनपा: १
*औरंगाबाद मंडळ एकूण: ३३ (३)*
लातूर: ८
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ०
*लातूर मंडळ एकूण: १२*
अकोला: ७ (१)
अकोला मनपा: ८
अमरावती: ०
अमरावती मनपा: ६ (१)
यवतमाळ: १३
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: १
*अकोला मंडळ एकूण: ५६ (३)*
नागपूर: २
नागपूर मनपा: ५८ (१)
वर्धा: ०
भंडारा: ०
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
*नागपूर मंडळ एकूण: ६३ (१)*
*इतर राज्ये: ११ (२)*
*एकूण: ३६४८ (२११)*
*(या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्त्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा, मनपांनी उपलब्ध करून दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत.)*
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३४४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ५९९४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २३ लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!