राज्यात ४२ हजार २१५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; ३५ हजार १५६ जण घरी परतले: आरोग्यमंत्री
मुंबई, दि.५: राज्यात आज १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४२ हजार २१५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख २२ हजार ९४६ नमुन्यांपैकी ८० हजार २२९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याचे प्रयोगशाळा चाचण्यांचे दर दशलक्ष प्रमाण ३८२७ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २८३२ इतके आहे.
राज्यात ५ लाख ४५ हजार ९४७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ३७५ खाटा उपलब्ध असून सध्या ३० हजार २९१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज १३९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७५ पुरुष तर ६४ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १३९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७८ रुग्ण आहेत तर ५३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या १३९ रुग्णांपैकी ११० जणांमध्ये ( ७९ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २८४९ झाली आहे.