रॅपिड अॅन्टिजेन टेस्टबाबत पंढरीत आरोग्य अधिकारी व कर्मचार्यांना प्रशिक्षण
पंढरपूर, – वाखरी येथील कोविड केअर सेंटर येथे रॅपिड अॅन्टिजेन टेस्टबाबतचे प्रशिक्षण तालुक्यातील 8 प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले.
यावेळी पंढरपूर पंचायत समिती सभापती अर्चना, व्हरगर, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ.जयश्री ढवळे मॅडम, डॉ. भिंगे, डॉ. सरवदे उपस्थित होते.
यावेळी कोरोनायोध्दा असणारे डॉक्टर ,आरोग्य,पोलीस कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी डॉ. भिंगे यांनी रॅपिड अॅन्टिजन टेस्टबाबतचे मार्गदर्शन केले. या टेस्टमुळे कोरोनाबाबतचा अहवाल अवघ्या तीस मिनिटात उपलब्ध होतो. या टेस्टचा आगामी काळात मोठ्या प्रमाणात उपयोग होईल असे डॉ. जयश्री ढवळे यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके यांनी एखाद्या गावात कोरोना रुग्ण सापडल्यानंतर तातडीने हायरिस्क व लोरिस्क संपर्क शोधून त्यांना तातडीने संस्थात्मक व गृह विलगीकरणात ठेवण्याच्या सूचना केल्या. त्याचबरोबर नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नागरिकांनी आहारात प्रथिने, व्हिटॅमिन क, फळे यांचा वापर करावा तसेच आयुष मंत्रालय मार्गदर्शक सूचना पाळाव्यसात यासह योगा, प्राणायाम, जलनेती याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. गावातील वयोवृद्ध व्यक्तींची जास्त काळजी घ्या अशी सूचना त्यांनी यावेळी केली.