विठ्ठल कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे भगीरथ भालके यांची बिनविरोध निवड
पंढरपूर – कै.आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांची सोमवारी (21 डिसेंबर) रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यासाठी सहाय्यक निंबधक एन.एस. तांदळे यांनी कारखाना कार्यस्थळावर संचालक मंडळाच्या बैठकीचे आयोजन केले होते.
दरम्यान विठ्ठल कारखान्याचे अध्यक्षपद भगीरथ भालके यांच्याकडे आल्याने ते आता विठ्ठल परिवाराचे नेते ही झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नुकताच सरकोलीचा दौरा केला होता. तेंव्हा त्यांनी भगीरथ भालके यांच्याच हाती या परिवाराची सूत्रं देण्याचे सुतोवाच केले होते. दरम्यान पवार यांनी या दौर्यात विठ्ठलाच्या सर्व संचालकांना तसेच या परिवारातील नेत्यांना एकत्रित काम करण्याचा सल्ला दिला होता तसेच आपले लक्ष या भागावर असल्याचेही सूचित केले होते. दरम्यान या कारखान्याचे संचालक व कै.औदुंबरआण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील हे अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. मात्र चर्चेतून मार्ग काढत संचालक मंडळाने भगीरथ भालके यांची अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बोलाविण्यात आलेेल्या बैठकीत अध्यक्षपदासाठी भगीरथ भालके यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांनी निवड बिनविरोध झाली आहे.
या कारखान्याचे अध्यक्षपद 2002 पासून कै.आमदार भारत भालके यांच्याकडे होते. त्यांचे 27 नोव्हेंबर रोजी निधन झाले आहे. तत्पूर्वी ज्येष्ठ संचालक व परिवाराचे नेते राजूबापू पाटील यांचे ही निधन झाले होते. यामुळे कारखान्याच्या अध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार? याकडे सार्यांचे लक्ष लागले होते. कै. भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांच्याकडेच ही जबाबदारी द्यावी अशी मागणी जोर धरत होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ही भालके यांच्याच नावाचा विचार केला होता. आगामी विधानसभेची पोटनिवडणूक पाहता कै. भारत भालके यांच्या कुटुंबातच उमेदवारी दिली जाणार हे निश्चित असल्याने विठ्ठलच्या चेअरमनपदाची धुरा भगीरथ भालके यांच्याच खांद्यावर येणार हे स्पष्ट होत होते.
विठ्ठल परिवाराने भारत भालके व राजूबापू पाटील यांच्यासारखी दिग्गत नेतृत्व गमावल्याने सहाजिकच कारखाना अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी काय होणार याची उत्सुकता सार्यांना होती. मात्र विठ्ठल परिवाराने एकीचे दर्शन घडवित भगीरथ भालके यांना संधी दिली. दरम्यान विठ्ठल परिवाराचे नेते तथा सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्यासह संचालक व नेते मंडळी येथे उपस्थित होती.