पंढरपूर – नव्याने सुरू झालेल्या दादर मुंबई ते पंढरपूर या रेल्वे गाडीचे पंढरपूर येथे अ.भा. ग्राहक पंचायतवतीने स्वागत करण्यात आले. मध्य रेल्वे विभागाने नव्याने मुंबईहून पंढरपूरपर्यंत विद्युतीकरण झाल्यानंतर विद्युत पुरवठ्यावर आलेली ही पहिलीच प्रवासी रेल्वे आहे.
मुंबई ते पंढरपूर अशी रेल्वे सेवा आठवड्यातुन तीन दिवस सुरू करण्यात आली आहे. दादरहून निघून पंढरपूर येथे पोहोचलेल्या पहिल्या गाडीचे हार्दिक स्वागत अ.भा. ग्राहक पंचायत सोलापूर जिल्हयातर्फे करण्यात आले.
यावेळी रेल्वे वरीष्ठ चालक अमनकुमार मोदी, सहाय्यक चालक एम एल सैनी, यांचे पुष्पगुच्छ देऊन जिल्हा संघटक शशिकांत हरिदास, प्रवासी विभाग प्रमुख कुमार नरखडे, जिल्हा कोषाध्यक्ष सुहास निकते यांनी स्वागत केले.यावेळी रेल्वे वरीष्ठ अभियंता रामदास गव्हाणे, अ.भा. ग्राहक पंचायतीचे तालुका सहसचिव प्रा धनंजय पंधे, प्रबोधन विभाग प्रमुख डॉ प्रशांत ठाकरे, तसेच मुकुंद भोसले,हमीद मिस्त्री, मनोजकुमार घोगरदरे, अभिषेक नरखडे, अनिरुद्ध पंधे, दामाजी माने, राजदत्त साळुंखे इ. उपस्थित होते.
ही गाडी पंढरपूर येथून (गाडी नंबर ०१०२८) प्रत्येक शनिवारी, सोमवारी, मंगळवारी रात्री ९-४५ वा.सुटणार आहे.