शनिवारच्या अहवालानुसार पंढरपूर तालुक्यात 67 रुग्ण वाढले , एकूण संख्या 2437

पंढरपूर – शनिवारी 29 आँगस्ट रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 31 व तालुक्यात 36 असे 67 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.

पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 437 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 47 आहे.

एकूण 715 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 1675 जण कोरोना मधून बरे झाले आहेत .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!