शनिवारी पंढरपूरची कोरोनाबाधितांची संख्या 115 , एकूण रूग्ण 866
पंढरपूर – शनिवार 8 ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालानुसार पंढरपूर शहर व ग्रामीण भागात 115 रूग्ण वाढले आहेत.
आजच्या अहवालानुसार उपचारा दरम्यान 1 जण मरण पावले आहेत.कोरोनामुळे आजवर मयत झालेल्यांची संख्या 22 झाली आहे.
शहरात आज 68 रुग्णांची नोंद आहे तर ग्रामीण भागात 47 कोरोनाबाधित आढळले आहेत. यात भोसे 15, गोपाळपूर 1, कासेगाव 3, खर्डी 2, खेडभाळवणी 1, ल.टाकळी 10, मुंढेवाडी 1, पिराची कुरोली 2, रोपळे 2, शेगाव दुमाला 5, तुंगत 2, सरकोली 3.