शनिवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 714 कोरोना रूग्ण वाढले, सात जणांचा मृत्यू
पंढरपूर – जिल्हा आरोग्य अधिकार्यांकडून आलेल्या अहवालानुसार शनिवार 10 एप्रिल रोजीच्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये (सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) 714 कोरोना रूग्ण आढळून आले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 142 आढळून आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली असून ग्रामीणमध्ये शनिवारी 7725 चाचण्या झाल्या असून यापैकी 7011 चाचण्या निगेटिव्ह तर 714 पॉझिटिव्ह आहेत. आज 451 जणांनी कोरोनावर मात केली तर सात जण मयत आहेत. आजवर जिल्हा ग्रामीणमध्ये 51 हजार 32 रूग्ण आढळून आले असून 1283 जणांनी प्राण गमावले आहेत तर 44 हजार 881 जण या आजारातून बरे झाले आहेत.सध्या 4868 जणांवर उपचार सुरू आहेत.
आजच्या अहवालानुसार सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 142, बार्शी 129 तर यापाठोपाठ माळशिरस 102, करमाळा 72 तर माढा 91 अशी नोंद आहे. आज ग्रामीणमध्ये सातजण कोरोनामुळे मयत असून यात बार्शी व दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रत्येकी 2, तर माळशिरस, मंगळवेढा व सांगोला तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे.
आजवर पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक रूग्ण आढळून आले असून शनिवारी शहरात 36 तर ग्रामीणमध्ये 106 कोरोनाबाधित वाढले आहेत. येथील एकूण संख्या 9782 इतकी झाली असून आजवर या आजारात 254 जणांनी प्राण गमावले आहेत. सध्या 763 जणांवर उपचार सुरू असून 8765 जणांनी या आजारावर मात केली आहे.