शनिवारी सोलापूर शहरात कोरोनाचे 75 रुग्ण वाढले

सोलापूर – सोलापूर शहरात शनिवारी 5 सप्टेंबरच्या अहवालानुसार 75 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. येथील एकूण रुग्णसंख्या आता 6960 इतकी झाली आहे. आज 597 अहवाल प्राप्त असून यापैकी 522 निगेटिव्ह तर 75 पॉझिटिव्ह आहेत. प्रलंबित अहवाल 131 असून आज 1 मृत्यूंची नोंद आहे. आजतागायत कोरोनामुळे 426 मृत्यू शहरात झाले आहेत.शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या 17 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत कोरोनावर मात करून 5858 जण घरी गेले आहेत.सध्या 676 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!