शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणांबाबत खेळाडू, नागरिक, संघटनांना सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन

पुणे,दि. २०: शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारी 2021 पर्यंत मागविण्याचे शासनाचे निर्देशित केलेले आहे. पुरस्काराच्या प्रस्तावित सुधारणा नियमावलीची प्रत क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विभागीय उपसंचालक कार्यालय अथवा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी पुणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी विजय संतान यांनी केले आहे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रतीवर्षी शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती खेळाडू, साहसी, दिव्यांग खेळाडू पुरस्कार देण्यात येतात. याबाबतची नियमावली शासन निर्णय 24 जानेवारी 2020 नुसार निर्गमित केलेले आहे. यामध्ये नियमावलीमध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे.

शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारी 2021 पर्यंत मागविण्याचे शासनाचे निर्देशित केलेले आहे. पुरस्काराच्या प्रस्तावित सुधारणा नियमावलीची प्रत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

पुरस्कार नियमावलीच्या प्रस्ताव सुधारणांबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांनी आपल्या सुचना,अभिप्राय [email protected] किंवा [email protected] या मेलवर 22 जानेगवारी 2021 पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांचेमार्फत करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विभागीय उपसंचालक कार्यालय अथवा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी पुणे यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन क्रीडा विभागाकडून करण्यात आले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!