शुक्रवारी पंढरपूर तालुक्यात 35 कोरोना रुग्ण वाढले
पंढरपूर – शुक्रवारी 21 आँगस्ट रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 23 व तालुक्यात 12 असे 35 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.
पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 035 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 37 आहे.
एकूण 1100 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 898 जण कोरोना मधून बरे झाले आहेत .