शुक्रवारी सोलापुरात 82 जण कोरोनामुक्त तर 45 नवे रुग्ण

सोलापूर – सोलापूर शहरात 14 आँगस्ट शुक्रवारी 45
कोरोनात रुग्ण आढळले आहेत. यामुळे एकूण रुग्ण संख्या 5689 इतकी झाली असून आज कोरोनामुक्त झालेल्या 82 जणांना रूग्णालयातून सोडण्यात आले आहे.

आजपर्यंत 4400 जणांनी कोरोना आजारावर मात केली आहे तर 902 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी 2 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. आजतागायत एकूण 387 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.

शुक्रवारी 2216 अहवाल प्राप्त झाले असून 2170 निगेटिव्ह तर 45 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!