शुक्रवारी सोलापूर ग्रामीणमध्ये 620 रुग्ण वाढले तर 414 कोरोनामुक्त झाले

सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाकाक्षेत्र वगळून) शुक्रवारी 18 सप्टेंबर रोजी एकूण 620 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात 138 आढळले आहेत. यापाठोपाठ माळशिरस तालुक्यात 131 तर बार्शी तालुक्यात 120 कोरोनाबाधित वाढले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 414 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 7 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्‍यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 19925 इतकी झाली असून यापैकी 12598 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 6777 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 414 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 550 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 7 जण मयत आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!