शुक्रवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 216 रूग्ण वाढले तर 434 जण झाले कोरोनामुक्त
सोलापूर- सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) शुक्रवार 9 आँक्टोबर रोजी एकूण 216 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात 50 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 434 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 3 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 27393 इतकी झाली असून यापैकी 21945 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 4698 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 434 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 750 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 3 जण मयत आहेत.
पंढरपूर तालुक्यात 38 रूग्ण वाढले
पंढरपूर – शुक्रवार 9 आँक्टोबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 15 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 23 असे 38 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 371 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 131 झाली आहे.एकूण 549 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 4698 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .