शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यात 176 कोरोनाबाधितांची भर , 3 जण मयत
पंढरपूर – शुक्रवारी 12 मार्च रोजी आलेल्या अहवालानुसार सोलापूर शहरात 89 तर ग्रामीणमध्ये 87 अशी 176 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. सोलापूर शहरात तीनजणांनी आज या आजारात प्राण गमावले आहेत.
सोलापूर शहरात 920 चाचण्या झाल्या असून 831 निगेटिव्ह तर 89 पाँझिटिव्ह आहेत. शुक्रवारच्या अहवालानुसार शहरात 3 जण कोरोनामुळे मयत आहेत.यात दोन पुरुष व एका स्त्री रुग्णाचा समावेश आहे.
सोलापूर ग्रामीणमध्ये गुरूवारी सर्वाधिक रूग्ण बार्शी तालुक्यात 27 तर यापाठोपाठ माळशिरस 26 , करमाळा 11 तर पंढरपूरमध्ये आठ जणांची नोंद आहे. जिल्हा ग्रामीणचा विचार केला येथे 41 हजार 379 रूग्ण आजवर आढळून आले असून 1195 जण या आजारात दगावले आहेत. सध्या 728 जणांवर उपचार सुरू आहेत तर 39 हजार 456 जण या आजारातून बरे झाले आहेत.
सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात आढळून आले आहेत. आजवर या तालुक्यात 8311 रूग्ण आढळून आले असून 244 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. सध्या 94 जणांवर उपचार सुरू आहेत तर 7973 जणांनी कोरोनावर मात केली आहे.