शुक्रवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 45 कोरोनाबाधित आढळले

पंढरपूर- शुक्रवार 5 मार्च रोजी आलेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 45 रूग्ण आढळून आले असून आजवर ग्रामीणमध्ये 40 हजार 846 कोरोनाबाधित सापडले आहेत. 1188 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. सध्या 531 जण उपचार घेत असून 39 हजार 123 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.

शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार 45 रूग्ण एकाच दिवशी आढळून आले असून सर्वाधिक माढा तालुक्यात 11 आहेत. यापाठोपाठ माळशिरस 9 तर पंढरपूर तालुक्यात 8 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याने प्रशासनाने काही निर्बंध ही लागू केले असून रात्र संचारबंदी लागू आहे.

दरम्यान पंढरपूर शहरात 3 तर तालुक्यात 5 रूग्णांची भर शुक्रवारी पडली असून येथील एकूण संख्या 8243 इतकी झाली आहे. सध्या 59 जणांवर केवळ उपचार सुरू आहेत. 7941 जण उपचार घेवून परत घरी गेले आहेत तर 243 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. आजवर सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक रूग्ण हे पंढरपूर तालुक्यातच आढळून आले आहेत.

शुक्रवारी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 1674 चाचण्या झाल्या असून यापैकी 1629 निगेटिव्ह आहेत तर 45 पॉझिटिव्ह आहेत. आज 47 जणांना डिसचार्ज देण्यात आला आहे तर एकजण कोरोनामुळे मयत झाला आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!