श्री विठ्ठलाच्या चंदन उटी पूजेस प्रारंभ
पंढरपूर– उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे श्रीविठ्ठल-रुक्मिणी ला चंदनाची उटी पूजा सुरू झाली असून गुरुवारी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सपत्नीक याचा शुभारंभ केला.
चैत्र पाडव्यापासून पुढील दोन महिने देवाला उटी पूजा करण्याची परंपरा आहे. चंदनाचे गंध उगाळून रोज दुपारी साडेचार वाजता देवाला लावले जाते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असले तरी ही परंपरा समितीच्या वतीने पाळण्यात येत आहे. पाडव्यादिवशी दागिन्याचा पोशाख असल्यामुळे रात्री उटी पूजा करण्यात आली होती. मात्र आज गुरुवार पासून दुपारी उटी पूजेस प्रारंभ झाला आहे.