श्री विठ्ठल सभामंडप व परिवार देवता मंदिरांच्या सुशोभिकरणासाठी भक्तांकडून 1 कोटीहून अधिकची देणगी, भूमिपूजन संपन्न
पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदि समतीच्या वतीने पाच परिवार देवता व श्री विठ्ठल सभामंडपाचे सुशोभिकरण केले जात असून यासाठी जवळपास 1 कोटी 27 लाख 50 हजार रूपये खर्च अपेक्षित असून यातील बहुतांश रक्कम विठ्ठल भक्तांनी देणगी स्वरूपात दिली आहे. या कामाचे भूमिपूजन गुरूवार 25 फेब्रुवारी रोजी करण्यात आले असल्याची सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
2015 मध्येच श्री विठ्ठल रूक्मिणी मंदि समितीने शहर व परिसरातील 28 परिवार देवता आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. या देवतांच्या मंदिराचे संवर्धन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. त्यानुसारच परिवार देवताच्या 5 मंदिरासह विठ्ठलाच्या सभा मंडपाच्या सुशोभिकरणाच्या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले.
परिवार देवतांमधील गोपाळपूर रस्त्यावरील रिद्धी सिद्धी मंदिराचे सुशोभिकरण होत असून यासाठी 16 लाख 50 हजार रूपये खर्च अपेक्षित असून हा निधी मंदि समिती खर्च करणार आहे तर याच रस्त्यावर असणाऱ्या लक्ष्मण पाटील देवस्थानाच्या सुशोभिकरणारी मुंबर्इचे भाविक राम बच्चन यादव यांनी आठ लाख रूपये देणगी देवू केली आहेत. शहरातील अंबाबार्इ पटांगणाशेजारी असणाऱ्या श्री अंबाबाई मंदिराच्या संवर्धन व सुशोभिकरणासाठी पुण्याचे भक्त दीपक नारायण करगळ यांनी पंचवीस लाख रूपयांची देणगी दिली आहे. हरिदास वेस येथील रोकडोबा मारुती मंदिराचे संवर्धन व सुशोभिकरण करण्यासाठी श्रीकांत कोताळकर यांनी 23 लाख रूपयांची देणगी दिली आहे. श्री सोमेश्वर महादेव मंदिराच्या नूतनीकारणासाठी कोल्हापूरचे भक्त अशिम अशोक पाटील यांनी 25 लाख रू श्री श्री विठ्ठल सभा मंडपाच्या सुशोभिकरणाच्या कामासाठी पुण्याचे नानासाहेब दिनकर पाचकुंदकर पाटील यांनी 30 लाख रू. देणगी देवू केली आहे.
यावेळी कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाद, सदस्य संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख, शकुंतला नडगिरे, नगराध्यक्षा साधना भोसले यांच्यासह कर्मचारी , अधिकारी उपस्थित होते.