सरकोलीतील 100 पूरग्रस्तांना स्वेरीचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिला मदतीचा हात
पंढरपूर: पाण्याने संपूर्ण वेढा घातलेल्या सरकोली गावातील शंभर पुरग्रस्त कुटुंबियांना अन्नधान्याचे वाटप करून प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली.
सरकोली मधील मारुती मंदिरात मदतीचा हा कार्यक्रम पार पडला. सरकोली गावाला माण व भीमा या दोन्ही नद्यांमुळे बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना पुराचा सामना करावा लागला. हे पाहून स्वेरी महाविद्यालयाचे प्रचार्य शिक्षणतज्ज्ञ डॉ. रोंगे सर मदतीला धावले . कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास भोसले यांनी केले.
डॉ. रोंगे म्हणाले की, ’सरकोली गावाला संपूर्ण पाण्याने वेढा घातला असून येथील नागरिक परिस्थितीशकतो मागील चार दिवस धैर्याने टक्कर देत आहेत. खरंच त्यांच्या धैर्याला सलाम. पूरग्रस्तांच्या पाल्यांना ‘कमवा व शिका’ योजनेतून शिक्षण देण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्राथमिक स्वरुपात पूरग्रस्त इंदुबाई बाबूराव बसरकोडे या महिलेला मदत करून सरकोलीमधील १०० कुटुंबीयांना मदत दिली. यावेळी राजेंद्र भोसले, अनिकेत गालफाडे, हनुमंत भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्यकारी सदस्य बाहुबली सावळे, विक्रम भोसले, संभाजीराजे शिंदे, दिलीप भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.