सहकार शिरोमणी कारखान्यात कामगारांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन तर ज्येष्ठ सभासदांनी केले मोळी पूजन
पंढरपूर- तालुक्यातील भाळवणी येथील वसंतराव काळे सहकारी साखर काररखान्याचा गळीत हंगाम आता सुरू होत असून यासाठी बॉयलर अग्न्रिप्रदीपन तसेच मोळीपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा मान कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता.
कारखान्याचा 21 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन विष्णु नामदेव पोरे, रघुनाथ झांबरे, दामोदर दुपडे, संभाजी नाईकनवरे या जेष्ठ कर्मचारी यांच्या हस्ते प्रदीपन करण्यात आले तर गव्हाण, व मोळी पूजन समारंभ कारखान्याचे जेष्ठ सभासद भगवान बुरांडे, ज्ञानेश्वर शेंबडे, नवनाथ माने, नारायण गायकवाड, महादेव कानगुडे, संजय गाजरे, रमेश नागणे यांच्या हस्ते संपन्न झाला.
तत्पूर्वी शेती विभागातील ओव्हरसिअर प्रकाश कृष्णा शिंगटे व त्यांच्या पत्नी सौ.नागरताई शिंगटे या उभयतांच्या शुभहस्ते होमहवन आणि जेष्ठ सभासद संजय गाजरे व त्यांच्यापत्नी सौ.निलावती गाजरे या उभयतांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार परमेश्वर लामकाने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमास कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, यशवंत पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण मोरे, उपाध्यक्ष शहाजी साळूंखे, विष्णु यलमर, महादेव देठे, श्री विट्ठल कारखान्याचे संचालक उत्तम नाईकनवरे, सीताराम महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणेश ठिगळे, निशिगंधा बँकेचे उपाध्यक्ष आर.बी.जाधव, व्यवस्थापक कैलास शिर्के, जनकल्याण हॉस्पिटलचे डॉ.सुधीर शिनगारे,श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे, सुरेश देठे जयसिंह देशमुख, मोहन उपासे,श्रीमंत लिंगडे,हणमंत मोरे,दिलीप भानवसे,अनिल नागटिळक,नारायण शिंदे, सुनील पाटील,डॉ.महारनवर,महादेव सुरवसे,दाऊद शेख,रामचंद्र कौलगे, विविध संस्थांचे पदाधिकारी शिक्षक तसेच कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे, मारुती भोसले, संचालक गोरख जाधव, बाळासाहेब कौलगे, भारत कोळेकर, आण्णा शिंदे, दिनकर कदम, दिनकर चव्हाण,तानाजी सरदार, विलास जगदाळे, सुधाकर कवडे, राजाराम पाटील, युवराज दगडे, योगेश ताड, इब्राहिम मुजावर, अरुण बागल, उद्योजक नागेश फाटे, एम.एस.सी बँकेचे अधिकारी एस.जी.गावंडे कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.वाय.महिंद सर्व खाते प्रमुख उपखाते प्रमुख मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन समाधान काळे यांनी केले तर आभार संचालक दिनकर चव्हाण यांनी मानले.