पंढरपूर दि.9- स्व. वसंतराव (दादा) काळे यांच्या 19 व्या पुण्यतिथीनिमित्त सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखाना कार्यस्थळावर कल्याणराव काळे बहुउद्देशिय समाजसेवी संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळ्याची सांगता मळोली (ता.माळशिरस) येथील गुरुवर्य ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. कीर्तन सोहळ्याचे आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून येथे होत आहे.
कीर्तन सोहळ्याचे आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून येथे होत आहे.
याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे उपस्थित होते. प्रारंभी कारखान्याचे संस्थापक स्व.वसंतराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. स्व.वसंतराव काळे यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त कारखाना कार्यस्थळावर दरवर्षी धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उर्वरीत कार्यक्रमांना फ़ाटा देत 2 ते 9 फेब्रुवारी पर्यत केवळ कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रसिंध्द किर्तनकार ह.भ.प. मच्छिंद्र महाराज कावडे, शक्ती महाराज चव्हाण, बालकिर्तनकार भक्ती महाराज देठे, निवृत्ती महाराज नामदास, प्रदीप महाराज ढेरे, ज्ञानेश्वर महाराज पवार, एकनाथ महाराज चौगुले यांनी कीर्तनसेवा केली. व्यवस्थापक म्हणून कारखान्याचे शहाजी पासले, संचालक भारत कोळेकर, व धनंजय महाराज गुरव यांनी काम पाहिले.