सहकार शिरोमणी व सिताराम साखर कारखान्याच्या ऊस बिलाचे वाटप सुरू : कल्याणराव काळे
पंढरपूर, दि.22 – सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यास चालझू गळीत हंगामात गळीतास आलेल्या उसाचा पहिला हप्ता प्रतिटन.2 हजार ₹ व सन 2018-19 मधील उर्वरीत एफआरपीची रक्कम तसेच सिताराम महाराज साखर कारखान्याच्या सन 2018-2019 मधील ऊस बिलापोटी प्रति मे.टन. 500₹ प्रमाणे निशिगंधा सहकारी बँक पंढरपूर येथे गटवार ऊस बिलाचे वाटप सुरु करण्यात आल्याची माहिती सहकार शिरोमणीचे चेअरमन तथा सिताराम महाराज साखर कारखान्याचे मार्गदर्शक कल्याणराव काळे यांनी दिली.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2020-21 मधील ऊस उत्पादक शेतकर्यांच्या दि.17/11/2020 ते 30/11/2020 या पंधरवड्यामध्ये गळीतास आलेल्या उसास पहिला हप्ता प्रति मे.टन.रु.2000/- प्रमाणे सुरु असून गळीत हंगाम 2018-19 मधील शेतकर्यांची उर्वरीत एफआरपी रक्कम ही दि.24/12/2020 पासून पंढरपूर येथील निशिगंधा सहकारी बँकेतून गटवाईज वाटप करण्यात येणार आहे.
तसेच ऊस तोडणी वाहतुकीची बिले कमिशनसह प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्था पंढरपूर येथे गट वाईज सुरु करण्यात आलेले आहेत. सिताराम महाराज साखर कारखाना खर्डी चे सन 2018-19 मधील ऊस बिलाच्या एफआरपी पोटी प्रति मे.टन रु.500/- प्रमाणे सोमवार दि.21/12/2020 रोजी गटवाईज पंढरपूर येथील निशिगंधा सहकारी बँक येथे वाटप सुरु करण्यात आले असल्याचे सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगीतले.
सहकार शिरोमणी व सिताराम महाराज साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांना आपल्या गटानुसार बिलाचे वाटप करण्यात येणार असून बँकेत कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर जास्त गर्दी होवू नये म्हणून कारखान्याच्या शेती विभागामार्फत संबंधीत शेतकर्यांना ऊस बिला संदर्भात निरोप दिल्यानंतरच बँकेत जावे असे आवाहन काळे यांनी केले आहे.