साखर कारखानदारीत अभिजित पाटील यांची आश्‍वासक वाटचाल, पोळ्यासाठी दोनशे रू. प्रतिटन ऊसबिल केले जाहीर

पंढरपूर– डीव्हीपी उद्योग समुहाच्या माध्यमातून विविध व्यवसाय यशस्वीपणे उभे करणार्‍या उद्योगपती अभिजित पाटील यांनी साखर कारखानदारीत ही आपला वेगळा ठसा उमटविला असून ज्यावेळी अनेक साखर कारखाने हे शेतकर्‍यांना उसाचे पैसे देण्यास ही असमर्थ ठरत आहेत अशा वेळी पाटील यांनी आपल्या धाराशिव साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांना पोळा सणासाठी दोनशे रूपये प्रतिटन हप्ता जाहीर केला आहे.
कारखानदारीत उतलेल्या अभिजित पाटील यांनी मराठवाडा व नाशिक भागातील साखर उद्योग सुरू केले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात नावलौकिक असलेल्या चोराखळी (ता.कळंब) येथील धाराशिव साखर कारखाना युनिट 1 या कारखान्याने गेल्या हंगामात 2019-20 मण्से शेतकरी सभासदांना ऊसबिलाचा पहिला हप्ता 2100 रूपये प्रतिटन देवू केला आहे. तर आता दुसरा हप्ता पोळा सणासाठी 200 रू प्रतिटन देण्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी घोषित केले आहे. हे बिलाचे पैसे शेतकर्‍यांना येत्या दोन दिवसात घरपोच धनादेशाद्वारे दिले जाणार आहेत.
हंगाम 2019 -20 शेतकर्‍यांच्या उसाला एफआरपीपेक्षा जास्त दर देणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले होते. दिलेला शब्द पाळत कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी त्यांनी आता ऊसबिलाचा दुसरा हप्ता 200 रूपये प्रतिटन देवू केला आहे. यंदा पाऊसकाळ चांगला असल्यामुळे या पैशातून पोळा, श्री गणेश व लक्ष्मी सणास वस्तू खरेदी करण्यास तसेच उसाची जोपासणूक करून खत तसेच पिकावरील फवारण्यांसाठी हा पैसा उपयोगी पडणार आहे.कारखाना नेहमी कर्मचारी आणि शेतकरी सभासदांच्या हिताचे निर्णय घेत असून सर्वांच्या सुख दुःखात नेहमी डीव्हीपी उद्योग समुहाचे चेअरमन अभिजित पाटील सहभागी असतात. त्यांनी 2018- 19 च्या एफआरपीपेक्षा जास्त दर दिला तसेच मागील 100 रूपये शेतकर्‍यांना देऊन आपला शब्द पाळल्याने शेतकर्‍यांमध्ये ही आनंदाचे वातावरण आहे.
येथील अनेक कारखाने गतहंगामात बंद राहिल्याने त्यांनी शेतकर्‍यांच्या मागणीवरून पंढरपूर भागातील ऊस ही मागील हंगामात धाराशिव कारखान्यात नेवून गाळला होता व दिलासा दिला होता. एका बाजूला अनेक साखर कारखान्यांनी शेतकरर्‍यांचा ऊस गाळून देखील त्यांना पैसे दिलेले नाहीत असा अनुभव असताना दुसरीकडे मराठवाड्यात साखर कारखानदारीत उतरलेल्या अभिजित पाटील यांनी मात्र पोळा सणाला ही दोनशे रूपये प्रतिटन ऊस बिल दिले आहे हे समाधान देणारे चित्र आहे. जिल्ह्यात मोजक्याच साखर कारखान्यांनी पोळ्यासाठी ऊस बिलाचा हप्ता जाहीर केला आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!