सिंहगड पंढरपूरच्या अभियांत्रिकी बाबतच्या वेबिनारमध्ये ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
पंढरपूर – बारावी सायन्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपुढे करिअरच्या बाबतीत अनेक पर्याय उपलब्ध असतात परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत नाही. यासाठी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या वतीने “इंजिनिअरिंग क्षेञात करिअरच्या संधी” या विषयावर प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. समीर कटेकर यांनी २२ जुलै रोजी सकाळी ऑनलाइन वेबिनार आयोजित केले होते यात ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या वेबिनारमध्ये प्रा. समीर कटेकर यांनी फेसबुक लाईव्ह व युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मेकॅनिकल , सिव्हिल , इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन श, काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाची माहिती दिली. हे शिक्षण घेतल्यास करिअरच्या पुष्कळ संधी असुन याचा फायदा पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेजमधील अनेक विद्यार्थ्यांना झाला असल्याचे सांगितले.
महाविद्यालयाच्या विविध विभागातील अनेक विद्यार्थी हे महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करून शासकीय सेवेत आहेत. याशिवाय महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी हे जगातील नामांकित कंपनीत तसेच परदेशात कंपनीत नोकरी तर काहीजण उद्योग क्षेत्रात करिअर करीत असल्याची माहिती कटेकर यांनी सहभागी विद्यार्थी व पालकांना दिली.
ही माहिती जाणून घेण्यासाठी महाविद्यालयाचे फेसबुक पेजवर Sinhgad Institute’s Pandharpur तसेच https://youtu.be/t0SY8pXew_o या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. इच्छुक विद्यार्थ्यी याचा लाभ घेवू शकतात.
हे वेबिनार यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. अनिल निकम, प्रा. नामदेव सावंत, अमोल नवले, राजेंद्र राऊत यांनी परिश्रम घेतले.