सिताराम कारखान्याचा 2020-21 हंगामासाठी ऊसबिलाचा पहिला हप्ता प्रतिटन 2 हजार रू. जाहीर
पंढरपूर, दि.28 – खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखान्याचा गाळप हंगाम 2020-21 सुरू असून कारखान्याने या हंंगामात 3 लाख मे.टन ऊस गाळपाचे नियोजन केलेले आहे. या हंगामात गाळपास येणार्या उसास इतर कारखान्याच्या बरोबरीने पहिला हप्ता प्रतिटन दोन हजार रूपयांप्रमाणे 15 दिवसाच्या आत आदा करणेत येईल. अशी माहिती कार्यकारी संचालक समाधान काळे यांनी दिली.
तसेच कारखान्याने मागील एफआरपी पोटी हप्ता प्रतिटन 500 रूपयांप्रमाणे गटनिहाय निशिगंधा बँकेत वर्ग केलेले असून संबंधित शेतकर्यांनी बँकेतून सदरची रक्कम घेवून जावी. तसेच उर्वरीत एफआरपी रक्कम लवकरच शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. तसेच चालू हंगामात कारखान्याकडे बिगर अॅडव्हान्स ऊस तोडणी वाहतूक करणार्या कंत्राटदाराना वाहतूक बिलावर 30 टक्के व तोडणी बिलावर 19 टक्के कमिशन विनाकपात दररोज खेप खाली झाल्यावर धनादेशाने आदा करण्यात येणार आहे. तरी कारखान्याचे ऊसपुरवठा सभासदांनी जास्तीतजास्त ऊस कारखान्यास गाळपास देवून सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी संचालक समाधान काळे यांनी केले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन गणेश ठिगळे, संचालक महादेव देठे, उत्तम नाईकनवरे जनरल मॅनेजर डी.के.शिंदे, टेक्निकल जनरल मॅनेजर बी.पी.शिंदे, वर्क्स मॅनेजर आर.एस.भिंगारे, मुख्य शेती अधिकारी एस.एस. आसबे, प्रशासन अधिकारी डी.एम.सुतार उपस्थित होते.