सोमवारच्या अहवालानुसार पंढरपूर तालुक्यात 124 रुग्ण वाढले
पंढरपूर – सोमवार 10 ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालानुसार पंढरपूर शहर व ग्रामीण भागात 124 रूग्ण वाढले आहेत.आजच्या अहवालानुसार उपचारा दरम्यान 2 जण मरण पावले आहेत.कोरोनामुळे आजवर मयत झालेल्यांची संख्या 26 झाली आहे.
आजच्या अहवालानुसार सर्वाधिक शेगाव दुमाला 18 तर आढीव येथे 16 रूग्ण आढळले आहेत.
शहरात 78 तर ग्रामीण भागात 46 रूग्ण आजच्या अहवालानुसार वाढले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूरची कोरोनाबाधित संख्या 1085 असून 458 जण उपचारानंतर घरी गेले आहेत तर 601 जणांवर उपचार सुरु आहेत.
ग्रामीणमध्ये आढीव 16, गोपाळपूर 1, करकंब 4, कासेगाव 1, ल.टाकळी 3, ओझेवाडी 1, सरकोली 1, शेगाव दुमाला 18, तनाळी 1 रुग्ण आढळला आहे.