सोमवारच्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 236 रुग्ण वाढले तर 309 जण झाले कोरोनामुक्त
सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) सोमवार 5 आँक्टोबर रोजी एकूण 236 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात 79 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 309 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 10 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 26536 इतकी झाली असून यापैकी 20680 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 5131 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 309 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 725 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 10 जण मयत आहेत.
पंढरपूर तालुक्यात 58 रूग्ण वाढले
पंढरपूर -सोमवार 5 आँक्टोबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 25 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 33 असे 58 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 159 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 1 जण मयत आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 128 झाली आहे.एकूण 699 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 4332 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .