सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाचा कहर सुरूच , शुक्रवारी 340 रूग्ण वाढले

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) शुक्रवारी 4 सप्टेंबर रोजी एकूण 340 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माढा तालुक्यात 70 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 190 जणांनी आज कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 13 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्‍यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 12849 इतकी झाली असून यापैकी 8891 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 3485 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 190 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 373 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 13 जण मयत आहेत.
बुधवार च्या अहवालानुसार तालुकानिहाय पॉझिटिव्ह सापडलेले नवे रूग्ण पुढीलप्रमाणे – अक्कलकोट 9, बार्शी 68, करमाळा 55, माढा 70 , माळशिरस 34, मंगळवेढा 13, मोहोळ 18, उत्तर सोलापूर 0, पंढरपूर 52, सांगोला 12, तर दक्षिण सोलापूर 1.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!