सोलापूर ग्रामीणमध्ये बुधवारी 394 नवे रुग्ण तर 20 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाकाक्षेत्र वगळून) बुधवारी 9 सप्टेंबर रोजी एकूण 394 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित बार्शी तालुक्यात 74 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 272 जणांनी आज कोरोनावर मात केली आहे. बुधवार अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 20 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 14916 इतकी झाली असून यापैकी 9955 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 4522 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 272 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 439 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 20 जण मयत आहेत.
मंगळवारच्या अहवालानुसार तालुकानिहाय पॉझिटिव्ह सापडलेले नवे रूग्ण पुढीलप्रमाणे – अक्कलकोट 6, बार्शी 74, करमाळा 48, माढा 57 , माळशिरस 56, मंगळवेढा 30, मोहोळ 9, उत्तर सोलापूर 2, पंढरपूर 49, सांगोला 55, तर दक्षिण सोलापूर 8.