सोलापूर ग्रामीणमध्ये रविवारी 506 रुग्ण वाढले, एकूण संख्या 20884
सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाकाक्षेत्र वगळून) रविवारी 20 सप्टेंबर रोजी एकूण 506 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात 133 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 336 जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 11 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 20884 इतकी झाली असून यापैकी 13371 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 6941 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 346 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 572 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 11 जण मयत आहेत.