सोलापूर ग्रामीणमध्ये शनिवारी 453 रुग्ण वाढले तर 437 जण झाले कोरोनामुक्त
सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाकाक्षेत्र वगळून) शनिवारी 19 सप्टेंबर रोजी एकूण 453 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात 139 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 437 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 11 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 20378 इतकी झाली असून यापैकी 13035 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 6782 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 437 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 561 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 11 जण मयत आहेत.