सोलापूर ग्रामीणमध्ये सोमवारी 513 कोरोनाबाधित, माळशिरस व पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळले

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाकाक्षेत्र वगळून) सोमवार 7 सप्टेंबर रोजी एकूण 513 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात 125 तर पंढरपूर तालुक्यात 124 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 205 जणांनी आज कोरोनावर मात केली आहे. रविवारी अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 16 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्‍यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 14185 इतकी झाली असून यापैकी 9499 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 4275 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 205 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 411 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 16 जण मयत आहेत.

बुधवार च्या अहवालानुसार तालुकानिहाय पॉझिटिव्ह सापडलेले नवे रूग्ण पुढीलप्रमाणे – अक्कलकोट 5, बार्शी 71, करमाळा 41, माढा 42 , माळशिरस 125, मंगळवेढा 42, मोहोळ 21, उत्तर सोलापूर 1, पंढरपूर 124, सांगोला 35, तर दक्षिण सोलापूर 6.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!