सोलापूर जिल्हाः ग्रामीणमध्ये कोरोनाबाधितांचे शतक
सोलापूर- जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता शंभर झाली असून बुधवारी 10 जून रोजी 18 नवे रूग्ण आढळून आले आहेत. आज दक्षिण सोलापूर तालुक्यात 10, उत्तर सोलापूरमध्ये 7 तर अक्कलकोटमध्ये 1 रूग्ण आढळून आला आहे.
आज ग्रामीण भागातील ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) 45 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 18 पॉझिटिव्ह आहेत तर 27 निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही शंभर झाली आहे. (यात एक रूग्ण पुण्यात पॉझिटिव्ह आढळला आहे). कोरोनामुळे जिल्ह्यात सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 33 जण घरी परतले आहेत. 61 जणांवर उपचार सुरू आहेत.
तालुका निहाय एकूण कोरोनाबाधितांची संख्याः अक्कलकोट 9, बार्शी 19, माढा 7, माळशिरस 2, मोहोळ 4, उत्तर सोलापूर 9,पंढरपूर 7, सांगोला 3, दक्षिण सोलापूर 40.