सोलापूर जिल्हा ःग्रामीणमध्ये 89 जणांची कोरोनावर मात, 115 रूग्णांवर उपचार सुरू

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजवर 215 कोरोनाबाधित आढळून आले असून यापैकी 89 जणांवर उपचार करून त्यांना घरी परत पाठविण्यात आले आहे तर 115 जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान मंगळवार 23 जून रोजी 11 रूग्णांची वाढ झाली असून यात मोहोळ, अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्ये प्रत्येकी तीन तर उत्तर सोलापूरमधील दोन जणांचा समावेश आहे.
आज एकूण 95 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 11 पॉझिटिव्ह तर 84 निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 35 अहवाल प्रलंबित आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (सोलापूर महानगरपालिका क्षेत्र वगळून) 2869 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी 2834 जणांची अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण पॉझिटिव्ह अहवाल 214 आहेत तर 2620 निगेटिव्ह आहेत. आजवर अकरा जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.
आतापर्यंत जे अकरा मृत्यू झाले आहेत यात अक्कलकोट 4, दक्षिण सोलापूर 3 तर बार्शी, माढा, मोहोळ व सांगोला येथे प्रत्येकी 1 जणांचा समावेश आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 89 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून यात अक्कलकोट 8, बार्शी 18, माळशिरस 4, मोहोळ 3, उत्तर सोलापूर 8,पंढरपूर 7, सांगोला 2, दक्षिण सोलापूर 39.
सध्या 115 जण उपचार घेत असून यात अक्कलकोट 28, बार्शी 11, करमाळा 1, माढा 6, माळशिरस 1, मोहोळ 9, उत्तर सोलापूर 7, दक्षिण सोलापूर 52.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!