सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये ३३ रूग्ण वाढले, एकूण संख्या ८५०
पंंढरपूर– सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) रविवारी १२ जुलै रोजी ३३ नवे कोरोनाबाधित वाढले आहेत. आजच्या अहवालानुसार कोरोनामुळे २ जणांना आज प्राण गमवावे लागले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८५० इतकी असून सध्या ४७४ जणांवर उपचार सुरू आहेत तर ३४० जण उपचारानंतर घरी गेले आहेत. आजवर ३६ जण कोरोनामुळे मरण पावले आहेत.
रविवारी १८४ अहवाल प्राप्त झाले असून १५१ निगेटिव्ह तर ३३ पाँझिटिव्ह आहेत. अद्याप ७२ अहवाल प्रलंबित आहेत.