सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये आज 283 कोरोना रूग्ण आढळले; पंढरपुरात 65 तर बार्शीत 63 ने वाढ
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून गुरूवारी 6 ऑगस्ट रोजी सकाळी आलेल्या अहवालानुसार अकरा तालुक्यांमध्ये 283 रूग्ण वाढले आहेत तर नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. आज सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर शहर व तालुक्यात 65 आढळले असून यापाठोपाठ बार्शीत 63 रूग्ण सापडले आहेत.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 584 इतकी असून आजवर 136 जणांना या आजाराने प्राण गमवावे लागले आहेत. सध्या 1 हजार 666 जणांवर उपचार सुरू असून 2782 जण उपचारानंतर घरी गेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोठी शहर म्हणून बार्शी व पंढरपूरकडे पाहिले जाते. बार्शीत एकूण रूग्णसंख्या ही 976 इतकी झाली आहे. तेथील 630 रूग्ण बरे झाले असून 300 जणांवर उपचार सुरू आहेत. तर पंढरपूरमध्ये रूग्णसंख्या ही 674 झाली असून 374 जण बरे झाले आहेत तर 289 जण अद्याप उपचार घेत आहेत.
गुरूवारच्या अहवालानुसार नऊ जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले असून यात अक्कलकोट 1, बार्शी 2, माढा 1, माळशिस 2, पंढरपूर 2 तर सांगोला तालुक्यातील एका रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आजवर 33 हजार 332 जणांची कोविड तपासणी करण्यात आली असून 33 हजार 190 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 142 प्रलंबित असून 28 हजार 607 निगेटिव्ह आहेत तर 4583 पॉझिटिव्ह आहेत. गुरूवारी 6 ऑगस्ट रोजी 2170 अहवाल मिळाले असून यापैकी 1 हजार 887 निगेटिव्ह तर 283 पॉझिटिव्ह आहेत. यात 170 पुरूष तर 113 स्त्रियांचा समावेश आहे. आज एकूण 211 जणांना घरी उपचारानंतर पाठविण्यात आले.
आज तालुकानिहाय पॉझिटिव्ह सापडलेले रूग्ण पुढीलप्रमाणे व कंसात आजवरचे एकूण रूग्ण – अक्कलकोट 19 (527), बार्शी 63 (976), करमाळा 16 (186), माढा 24 (347), माळशिरस 29 (293), मंगळवेढा 27 (159), मोहोळ (311), उत्तर सोलापूर 11 (328), पंढरपूर 65(684), सांगोला 6 (137) तर दक्षिण सोलापूर 20 (636).