सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये आजवर 3160 जण कोरोनामुक्त तर 2235 जणांवर उपचार सुरू
तालुकानिहाय कोरोनावर मात करून घरी गेलेल रूग्ण व उपचार सुरू असणारे कंसात – अक्कलकोट 433 (92), बार्शी 752 (348), करमाळा 91 (143), माढा 159 (243), माळशिरस 152 (265), मंगळवेढा 91 (97), मोहोळ 151 (185), उत्तर सोलापूर 256 (126), पंढरपूर 431 (506), सांगोला 86 (88) तर दक्षिण सोलापूर 558 (412).
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 557 इतकी असून आजवर 162 जणांना या आजाराने प्राण गमवावे लागले आहेत. सध्या 2 हजार 235 जणांवर उपचार सुरू असून 3160 जण उपचारानंतर घरी गेले आहेत. आज 9 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले असून यात अक्कलकोट 2, बार्शी 1, मोहोळ 1,उत्तर सोलापूर 2 तर पंढरपूर 2 व दक्षिण सोलापूर तालुका 1. रविवारी उपचारानंतर 117 जणांना घरी सोडण्यात आले. आज 3221 चाचण्या झाल्या यात 2850 अहवाल निगेटिव्ह आहेत तर 371 पॉझिटिव्ह आहेत.
रविवारच्या अहवालानुसार तालुकानिहाय पॉझिटिव्ह सापडलेले नवे रूग्ण पुढीलप्रमाणे व कंसात आजवरचे एकूण रूग्ण – अक्कलकोट 9 (551), बार्शी 52 (1148), करमाळा 20 (237), माढा 35 (411), माळशिरस 32 (422), मंगळवेढा 13 (190), मोहोळ 10 (347), उत्तर सोलापूर 36 (399), पंढरपूर 95 (961), सांगोला 15 (176) तर दक्षिण सोलापूर 54 (715).