सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये रविवारी 435 रुग्ण वाढले, एकूण संख्या 23996
सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) रविवारी 27 सप्टेंबर रोजी एकूण 435 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित बार्शी तालुक्यात 90 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 215 जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 14 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 23996 इतकी झाली असून यापैकी 17061 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 6276 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 215 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 659 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 14जण मयत आहेत.
पंढरपूर तालुक्यात 79 रुग्ण वाढले
पंढरपूर – रविवारी 27 सप्टेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 31 व तालुक्यात 48 असे 79 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 672 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 2 जण मयत आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 114 झाली आहे.एकूण 703 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 3855 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .