सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये शुक्रवारी 125 रूग्ण वाढले, 248 जण झाले कोरोनामुक्त
सोलापूर- सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) शुक्रवारी 16 आँक्टोबर रोजी एकूण 125 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित बार्शी तालुक्यात 49 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 248 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 8 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 28702 इतकी झाली असून यापैकी 23929 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 3970 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 248 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 803 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 8 जण मयत आहेत.
पंढरपूर तालुक्यात 12 रूग्ण वाढले
पंढरपूर – शुक्रवारी 16 आँक्टोबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 6 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 6 असे 12 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 676 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 3 जण कोरोनामुळे मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 138 झाली आहे.एकूण 562 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 4976 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .