सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये आजवर 24636 जण कोरोनामुक्त , 3565 जणांवर उपचार सुरू ; सोमवारी 111 रूग्णांची भर
सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) सोमवार 19 ऑक्टोंबर रोजी एकूण 111 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात 52 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 215 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 10 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची आता संख्या कमी होताना दिसून या आजाराव़र मात करून घरी परतणार्यांची संख्याच वाढली आहे. जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 29034 इतकी झाली असून यापैकी 24636 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 3565 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 215 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 833 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 10 जण मयत आहेत.
पंढरपूर तालुक्यात 20 रूग्ण वाढले
पंढरपूर- सोमवारी 19 ऑक्टोंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 6 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 14 असे 20 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 736 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 4 जण कोरोनामुळे मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 148 झाली आहे.एकूण 527 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 5061 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .