सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये सोमवारी 133 रुग्ण वाढले, एकूण संख्या 29984
सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) सोमवार 26 ऑक्टोंबर रोजी एकूण 133 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस व बार्शी तालुक्यात प्रत्येकी 39 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 151 जणांनी कोरोनावर मात केली आहे.सोमवारी अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 4 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची आता संख्या कमी होताना दिसून या आजाराव़र मात करून घरी परतणार्यांची संख्याच वाढली आहे. जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 29984 इतकी झाली असून यापैकी 26160 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 2935 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 151 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 889 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 4 जण मयत आहेत.
पंढरपूर तालुक्यात 11 रूग्ण वाढले
पंढरपूर- सोमवारी 26 ऑक्टोंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 6 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 5 असे 11 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 884 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 2 जण कोरोनामुळे मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 168 झाली आहे.एकूण 383 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 5333 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .