सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोनावर उपचार घेणार्यांची संख्या केवळ 324 , आजवर एकूण रूग्ण आढळले 39 हजार 666
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजवर 39 हजार 666 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून आता केवळ 324 जणांवर उपचार सुरू आहेत. बुधवार 3 फेब्रुवारी रोजी जिल्हा ग्रामीणमध्ये 30 रूग्ण आढळून आले असून सर्वाधिक 10 पंढरपूर तालुक्यात आहेत.
कोरोनामुळे सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये आजवर 1164 जणांनी आपले प्राण गमावले आहेत तर या आजारावर मात करणार्यांची संख्या 38 हजार 178 इतकी आहे. सध्या केवळ 324 जणांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी आलेल्या अहवालानुसार 30 रूग्ण विविध तालुक्यात आढळून आले असून यात पंढरपूर तालुका 10, बार्शी 4, करमाळा 1, माढा 2, माळशिरस 7, मंगळवेढा 4, उत्तर सोलापूर 1, दक्षिण सोलापूर 1.