पंढरपूर – शनिवार 13 मार्च रोजी आलेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये ( महापालिका क्षेत्र वगळून) 107 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर एका रुग्णाने कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.
सोलापूर ग्रामीणमध्ये शनिवारी सर्वाधिक रूग्ण माळशिरस तालुक्यात 28 तर यापाठोपाठ पंढरपूर 23 , माढा 19 अशी नोंद आहे. जिल्हा ग्रामीणचा विचार केला येथे 41 हजार 486 रूग्ण आजवर आढळून आले असून 1196 जण या आजारात दगावले आहेत. सध्या 774 जणांवर उपचार सुरू आहेत तर 39 हजार 516 जण या आजारातून बरे झाले आहेत. आज साठ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात आढळून आले आहेत. आजवर या तालुक्यात 8334 रूग्ण आढळून आले असून 244 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. सध्या 113 जणांवर उपचार सुरू आहेत तर 7977 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
आज पंढरपूर शहरात 3 तर तालुक्याच्या ग्रामीण भागात 30 रुग्ण आढळले आहेत.