सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 17 नवे रूग्ण, एकूण संख्या 360
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) सोमवार 30 जून रोजी आणखी 17 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. आता एकूण बाधितांची संख्या ही 360 इतकी झाली आहे. आज ऐन आषाढी दशमी दिवशी पंढरपूरमध्ये सात जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
मंगळवारी एकूण 129 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 112 निगेटिव्ह आले तर 17 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अद्याप 34 जणांचे स्वॅब तपासणीचे अहवाल प्रलंबित आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (सोलापूर महानगरपालिका क्षेत्र वगळून) 3807 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी 3773 जणांची अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण पॉझिटिव्ह अहवाल 360 आहेत तर 3413 अहवाल निगेटिव्ह आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजपर्यंत कोरोनामुळे 17 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
मंगळवारी जे 17 नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत पंढरपूरमधील 7, मोहोळ 4, अक्कलकोट 2 तर उत्तर सोलापूर तालुक्यातील 4 जणांचा समावेश आहे.
ऐन आषाढी दशमी दिवशी सकाळी पंढरपूरमध्ये सात कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे आजवर येथील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 16 झाली आहे. मध्यंतरी पंढरी कोरोनामुक्त झाली होती मात्र चार दिवसापूर्वीच दोन रूग्ण तालुक्यात आढळून आले व यानंतर आता ही संख्या वाढू लागली आहे. पंढरपूर शहरातील जुनी पेठे, नवी पेठ, गाताडे प्लॉट, रूक्मिणी नगर, घोडके गल्ली,औंदुबरराव पाटील नगर, भक्त निवास या ठिकाणी हे रूग्ण आढळून आले आहेत. यात एका अधिकार्याच्या गाडीचा चालक तसेच एका बँकेचे संचालक यांचा समावेश आहे. सध्या नऊ रूग्णांवर उपचार सुरू असून सात जण बरे होवून घरी गेले आहेत.
आज उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी, बाणेगाव व तिर्हे येथे प्रत्येकी रूग्ण आढळून आला आहे. तर मोहोळमधील क्रांतीनगर 2, मेहबूबनगर 1, नागनाथ गल्ली येथे 1 जण कोरोनाबाधित आढळून आला आहे. तर अक्कलकोट तालुक्यातील जेऊरवाडी व बोरगाव येथे प्रत्येकी एका रूग्णाची नोंद आहे.
जिल्ह्यात एकूण 361 रूग्ण आजवर आढळून आले असून यापैकी 202 जणांवर उपचार सुरू आहेत तर 142 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.